Maval : मतदान प्रक्रियेसाठी 12 हजार 659 अधिकारी, कर्मचारी सज्ज

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (सोमवारी) मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघांसाठी 12 हजार 659 अधिकारी व कर्मचा-यांची मतदान प्रक्रीयेसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात घाटाखालील पनवेल, कर्जत, उरण या तीन मतदारसंघासह घाटावरील मावळ, चिंचवड आणि पिंपरी अशा सहा मतदारसंघांचा समावेश होतो. मावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख 27 हजार 733 मतदार आहेत. तर, 2 हजार 504 मतदान केंद्र असणार आहेत. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी 12 हजार 659 अधिकारी व कर्मचा-यांची मतदान केंद्रासाठी नेमणूक करण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचा-यांची करण्यात आलेली नेमणूक पाहता प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी सुमारे सहा अधिकारी-कर्मचारी उपस्थित असतील. तर, सरासरी 154 मतदारांमागे एक कर्मचारी असणार आहे.

लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी असे मनुष्यबळ तैनात असणार आहे. मावळ मतदारसंघाअंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा असून 5 लाख 14 हजार 902 मतदारांसाठी 584 मतदान केंद्र असणार आहेत. तर, 3260 अधिकारी व कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, सर्वात कमी मतदार कर्जत विधानसभा मतदारसंघात 2 लाख 75 हजार 477 एवढे आहे. त्या ठिकाणी 2087 कर्मचारी असणार आहेत.

राखीव कर्मचा-यांचीही नेमणूक

मावळ मतदारसंघातील मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट मशीन व इतर साधनांची तंतोतंत जुळणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने कंबर कसली आहे. व्हीव्हीपॅट मशीन संदर्भात निवडणूक विभागाने वेळोवेळी कर्मचा-यांना प्रशिक्षणही दिले आहे. लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. निवडणूक कार्यालयाने खबरदारीचा उपाय म्हणून राखीव कर्मचा-यांची मोठ्या संख्येने नेमणूक केलेली आहे.

विधानसभा मतदान केंद्र कर्मचारी संख्या मतदार संख्या


MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.