Maval : मतदानासाठी आल्या परदेशातून मात्र मतदार यादीतून नावच गायब ! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाठी आज (सोमवार) सकाळपासून मतदान सुरु आहे. मतदाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नवमतदारांसह सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणजेच महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी रसिका दीपक जोशी बाहरीन या देशातून निगडी येथे मतदानासाठी आल्या; मात्र मतदार यादीतून त्यांचे नावच गायब झाले आहे. त्यामुळे त्या मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

रसिका दीपक जोशी बाहेरीन या देशात नोकरीनिमित्त वास्तव्याला आहेत. त्यांचे निगडी, यमुनानगर येथे मतदान आहे. त्या प्रत्येक निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरात येऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावितात. न चुकता त्यांनी प्रत्येक निवडणुकीला शहरात येऊन मतदानाचा हक्क बजाविला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी देखील त्या शुक्रवारी (दि. 26) बाहरीन देशातून शहरात आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणजेच महायुतीला मतदान करण्यासाठी त्या उत्साही होत्या. परंतु, मतदार यादीतून त्यांचे नावच गायब झाले. त्यामुळे त्या मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना रसिका जोशी म्हणाल्या, “प्रत्येक निवडणुकीला मी बाहरीन येथून शहरात येऊन मतदान करते. संविधानाने दिलेला आपला पवित्र हक्क बजाविते. निगडी येथील मतदान केंद्रात माझे नाव होते. माझ्याकडे मतदान कार्ड देखील आहे. परंतु, मतदार यादीत नाव नसल्याचे सांगितले जात आहे. मतदारांना निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी आपले नाव अपडेट करून घेण्यासाठी सांगण्यात आले होते असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, मी बहारीनला असल्यामुळे याबाबतची सूचना मला मिळाली नाही. परंतु माझ्याकडे माझे वोटर आयडी, आधार कार्ड आणि सर्व आवश्यक दाखले असतील तरीदेखील मला मतदान करू दिले जात नसेल मी भारतीय नागरिक असल्याचे मला वाईट वाटत आहे.” असे खेदपूर्वक त्यांनी नमूद केले. निवडणूक अधिका-यांचे चुकीमुळे मी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. माझ्याकडे मतदान कार्ड आहे. त्यामुळे मला मतदान करुन दिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करण्यासाठी मी उत्साही होते. मै भी चौकीदार हूँ. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी मी प्रचंड आनंदी होती. परंतु, निवडणूक अधिका-यांच्या चुकीमुळे मी मतदानापासून वंचित राहत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुण्याचे माजी उपमहापौर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसब्याचे माजी नगरअधिकारी पांडुरंग सातव यांच्या त्या कन्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.