BNR-HDR-TOP-Mobile

Maval: शतायुषी आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. नवमतदारांसह ज्येष्ठ मतदारांमध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी उत्साह दिसून येत आहेत. तळेगावदाभाडे येथील 100 वर्षीय मतदार मधुकर दत्तात्रय लोमटे यांनी मोठा उत्साहात आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला.

मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी आज (सोमवार) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मावळमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 18.04 टक्के तर शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये 16.21 टक्के मतदान झाले आहे.

मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. नवमतदारांसह ज्येष्ठ मतदारांमध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. तळेगावदाभाडे येथील 100 वर्षीय मतदार मधुकर दत्तात्रय लोमटे यांनी मोठा उत्साहात आपला मतदानाचा पवित्र हक्क बजाविला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3