Chakan : बीअरची बाटली गालावर फोडून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – बिअर रिकामी बाटली तरुणाच्या गालावर फोडून मारहाण करण्यात आली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना खेड तालुक्यातील मोई गावात सोमवारी (दि. 29) पहाटे चारच्या सुमारास घडली.

ज्ञानेश्वर शांताराम मापारी (वय 22, रा. श्रीकृष्ण नगर, सरस्वती शाळेजवळ, आकुर्डी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दाद्या करपे आणि सौरभ करपे (पूर्ण नाव माहिती नाही, दोघे रा. मोई, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर हे मोई येथील त्यांचा मित्र तेजस बिरदवडे याच्या घरी गेले होते. त्यावेळी आरोपींनी ‘तू आकुर्डी गावचा आहेस का, तुझ्याकडे पाहतो’ असे म्हणत आरोपी दाद्या याने ज्ञानेश्वर यांच्या गालावर बीअरची रिकामी बाटली फोडली. आरोपी सौरभ याने हाताने मारहाण केली. यामध्ये ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.