Vadgaon Maval : ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी मावळ तालुक्यातून 966 अर्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी 734 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आता पर्यंत 966 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहीती तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. 

15 जानेवारीला होणाऱ्या तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवार दि.23 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, दि.24 रोजी एकूण 34 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी दिवसभरात एकूण 198 अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वेळ वाढविला आहे. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतनिहाय आजअखेर दाखल झालेल्या अर्जाची संख्या पुढीलप्रमाणे : 

नवलाख उंबरे 38 अर्ज,  इंगळुन 9 अर्ज, माळेगाव बु 3, खांड 8 अर्ज, डाहुली  16 अर्ज, कशाळ 12 अर्ज, वडेश्वर 21 अर्ज, कुसवली 02 अर्ज,  आढे 14 अर्ज, परंदवडी 18,  उर्से 25 अर्ज, सोमाटणे 33 अर्ज, धामणे 23 अर्ज, दारुंब्रे 25 अर्ज, गहूंजे 16 अर्ज, सांगावडे 19 अर्ज, आंबी 21 अर्ज, माळवाडी 22 अर्ज, करजंगाव 7 अर्ज , गोवित्री  17 अर्ज, साई 19 अर्ज, घोणशेत 16 अर्ज, चिखलसे 19 अर्ज, खडकाळा 27 अर्ज, कुसगाव खुर्द 12 अर्ज, टाकवे बु 37 अर्ज, साते 43 अर्ज,नाणे 17 अर्ज, कांब्रे नामा 5 अर्ज, वेहेरगाव 21 अर्ज, ताजे 18 अर्ज, मळवली 17 अर्ज, पाटण 22 अर्ज, कार्ला 27 अर्ज,खांडशी 10 अर्ज,   उकसान 15 अर्ज, शिरदे 4 अर्ज तिकोणा 7 अर्ज, कोथुर्णे 2 अर्ज, वारू 12 अर्ज, मळवंडी ठुले 18 अर्ज , आपटी 8 अर्ज, अजीवली 8 अर्ज, मोरवे 7अर्ज, महागाव 31 अर्ज,आंबेगाव ० अर्ज, कुसगाव बु 39 अर्ज, कुरवंडे 29 अर्ज , येलघोल 7 अर्ज, शिवली 14 अर्ज, येळसे 19 अर्ज, बौर 22 अर्ज, पाचाणे 12 अर्ज,  कुसगाव पमा 7 अर्ज, थुगाव 9 अर्ज, शिवणे 19 अर्ज, आडले खुर्द 18

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.