Bhosari : पूर्ववैमनस्यातून तिघांना मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी मिळून तिघांना मारहाण केली. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 30) टेल्को रोड भोसरी येथे घडली.

हनुमंता नागनाथ माने (वय 29, रा. टेल्को रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महादेव माने, सुखदेव माने, प्रकाश शिंदे, चंद्रकांत माने, सोन्या पवार, गौरी पवार, (सर्व रा. टेल्को रोड, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनुमंता आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास हनुमंता आणि त्यांच्या आई-वडिलांना मारहाण केली. लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये फिर्यादी हनुमंता हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.