Pune : आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात साथ देणा-या स्मशानभूमीतील कामगारांचा सन्मान

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून कुसुमवात्सल्य फाउंडेशनतर्फे बुधवारी (दि. 1) स्मशानभूमीतील कामगारांचा जाहीर सन्मान व कुसुमवात्सल्य फाउंडेशन या संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. स्मशानभूमीतील काम करणाऱ्या दुर्लक्षित राहिलेल्या कामगाराला जगण्याचा सन्मान मिळावा, या उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक (कारागृह) डॉ विठ्ठलराव जाधव, शांतिदूत फाऊंडेशनच्या अध्यक्षा विद्या जाधव, नगरसेविका मनीषा कदम, नगरसेविका अमृता बाबर, शिरीष मोहिते, किरण गहिवरकर, राजाभाऊ कदम, उद्योजिका प्रीती काळे, ज्योती देशकर, दीपा परब, महेश धाडवे पाटील, मनोज मांगडे, यशवंत पाटील, योगिता पाटील, पूजा पाटील, जयप्रकाश पाटील, राधिका नगरे, वर्षा गवते, महेंद्र पाटील, तानाजी दुधाने, डॉक्टर बावसकर, राजाभाऊ पानगावे, सागर घाम, भूषण पाटील, यशवंत माझिरे, अशोक रायकर आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

कुसुमवात्सल्य फाउंडेशनच्या वतीने कात्रज तलाव येथील स्मशान भूमीतील ‘कामगारांचा सन्मान’ करण्यात आला. स्मशान भूमीतील 42 महिला व पुरुष कामगारांचा भेटवस्तू, मिठाई आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व कामगारांच्या डोळ्यात यावेळी आनंदाश्रु आले. “कामगारांच्या हिताचे रक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे, परंतु आज कामगार वर्ग सेवा सुविधांपासून वंचित राहिला आहे. अशा कामगारांच्या पाठीशी कुसुमवात्सल्य फाउंडेशन नेहमीच उभी राहील”, असे मत संस्थेच्या संस्थापिका वैशाली पाटील यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक वैशाली पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन किरण गहिवरकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1