Chinchwad : व्यक्तिमत्व स्पर्धेत अथर्व निगडीकर व सलोनी जैन प्रथम

एमपीसी न्यूज-  लायन युथ ऑयकॉन, नृत्य तेज अॅकॅडमीच्यावतीने युवती व युवकांसाठी व्यक्तिमत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत युवकांमध्ये अथर्व निगडीकर तर युवतींमध्ये सलोनी जैन यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ही स्पर्धा पार पडली. यावेळी एम.जे,एफ लायन्स ओमप्रकाश पेठे, डिस्ट्रिक गर्व्हनर इलेक्ट लायन श्रध्दा पेठे, लायन अनुराधा शास्त्री व एम.जे.एफ लायन उपप्रांतपाल हेमंत नाईक आदी उपस्थित होते. स्पर्धेचा सत्कार समारंभ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते झाला.

या स्पर्धेसाठी 50 युवकांनी नावनोंदणी केली. यामध्ये सनोनी जैन, श्रृष्टी पाटील, साक्षी गायकवाड, पूजा तायनाथ, श्रृष्टी गराडे, निकीता गव्हाणे, माधुरी लोखंडे, गौरव अमोडिझा, ओंकार अभ्यंकर, अथर्व निगडीकर, आनंद युहाल, गौरव भोरकडे, संदेश शेजवाल, प्रतीक शेजवाल अशा 15 स्पर्धकांची निवड झाली.

या स्पर्धेमध्ये युवती व युवकांचे तीन क्रमांक काढण्यात आले. टॅलेंट व फोटोजेनिक असे क्रमांक काढण्यात आले. युवकांमध्ये अथर्व निगडीकर (प्रथम), गौरव भगोडिया (द्वितीय), ओमकार अभ्यंकर (तृतीय). तर गौरव भोरकडे (मिस्टर फोटोजेनिक) व गौरव भंगोडिया हा (मिस्टर टॅलेंट) चा मानकरी ठरला. युवतींमध्ये सलोनी जैन (प्रथम), श्रृष्टी पाटील (द्वितीय), माधुरी लोखंडे (तृतीय) तर साक्षी गायकवाड (मिस टॅलेंट), सिध्दी गायकवाड (मिस फोटोजेनिक) मानकरी ठरली.

या स्पर्धेबाबत माहिती देताना तेजश्री अडिगे म्हणाल्या, “लायन्स क्लब ही संघटना सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना आहे. समाजामध्ये स्त्रिया, वृध्द, युवा तसेच गरजू लोकांसाठी काम करते. युवकांच्या समृध्दीकरिता या व्यक्तिमत्व स्पर्धेची गरज आहे. आजचा युवक हा उद्याचा नागरिक आहे. त्यासाठी ही स्पर्धा आहे. युवांना व्यासपीठ मिळावे म्हणून अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते” तेजश्री अडिगे या युवा विभाग सांभाळणा-या डिस्ट्रिक्ट 323 D 2 या युवा विभाग प्रमुख लायन्स आहेत.

अभिनेत्री व मॉडेल आशा नेगी, फॅशन फोटोग्राफर अश्विन कौलगुड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाची फॅशन कोरिओग्राफी करन नथानी या युवा मॉडेलने केली. लायन उमा पाटील, रेवती तातुस्कर, अमृता काकडे यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.