Talegaon Dabhade : जायंट्स ग्रुपच्या सदस्यांनी घेतला पानी फाऊडेशनच्या महाश्रमदान शिबिरात सहभाग

एमपीसी न्यूज- जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे, जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखी व यंग जायंट्स ऑफ तळेगाव दाभाडेच्या सदस्यांनी पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे येथे कामगार दिनानिमित्त 1 मे रोजी पानी फौंडेशन तर्फे आयोजित महाश्रमदान शिबिरात सहभाग घेऊन श्रमदान केले.

महाराष्ट्रात दुष्काळ निवारण करण्यासाठी ‘पानी फौंडेशन’ तर्फे मोठ्या प्रमाणात भरीव कामगिरी करण्यात येत आहे. कामगार दिनानिमित्त 1 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाश्रमदान शिबिरामुळे पावसाळ्यात जमिनीत पाणी मुरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भूजलाची पातळी वाढून दुष्काळाचे निवारण होणार आहे. त्याचप्रमाणे चर खणून झालेल्या मातीच्या बंधाऱ्यांवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडेचे संदीप गोंदेगावे, ॲड देविदास टिळे, सुमित पारखे, बाळासाहेब जामदार, जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखीच्या अध्यक्षा जयश्री टिळे, उपाध्यक्षा वंदना कोळी, सचिव सुप्रिया पारखे, सदस्या पौर्णिमा महामुनी व इतर सदस्य सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.