Vadgaon Maval : कान्हे येथे रविवारपासून बाल वारकरी अध्यात्मिक संस्कार शिबिर

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आयोजन

एमपीसी न्यूज- मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित निवासी बाल वारकरी अध्यात्मिक संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साईबाबा सेवाधाम कान्हे, ता मावळ येथे दि 12 ते रविवार दि 19 मे 2019 पर्यंत हे शिबिर पार पडणार आहे.अशी माहिती अध्यक्ष हभप नंदकुमार भसे यांनी दिली.

आजच्या संगणकीय युगात तरूण पिढी सुसंस्कारीत बनावी कारण संस्कारावरच संस्कृती अवलंबून असते. त्यामुळे आपल्या मुलांना योग्य संस्कार व अध्यात्मिक विचार मिळावेत, आपली मुले अधोगतीपासून दूर राहावी या पवित्र हेतुने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात हरिपाठ पाठांतर, श्रीमद्भगवदगीता संहिता, संत चरित्र, हनुमान चालिसा, शारीरिक व्यायाम, संस्कृत संभाषण वर्ग, सांस्कृतिक कार्यक्रम, शास्त्रोक्त पद्धतीने मृदंग वादन, गायन व वारकरी सांप्रदायिक इत्यादी प्रकारचे शिक्षण दिले जाणार आहे. या शिबिरासाठी प्रवेश अर्ज 12 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्यानंतर पालक सभा आयोजित करण्यात आली असून प्रवेश घेतलेल्या बाळ वारकऱ्यांच्या पालकांनी या सभेस उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तरी आपल्या मुलांचे वाईट संस्कारांपासून संरक्षण करण्यासाठी, एक आदर्श नागरिक बनण्यासाठी आपल्या पाल्यासाठी या शिबिरात प्रवेश घ्यावा असे आवाहन हभप नंदकुमार भसे यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना दरमहा २००० रुपये सरकारी मानधन मंडळातर्फे फॉर्म भरण्यात येत आलेत. यासाठी ५० वर्षांपुढील कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगमणी, निष्ठावान वारकरी पात्र असणार आहेत. त्यासाठी आधारकार्ड, रेशन कार्ड, दोन फोटो, वयाचा दाखला, उत्पन्नाचा तहसीलदार दाखला, ग्रामपंचायत रहिवासी दाखला, मिळालेल्या सन्मानपत्राची झेरॉक्स कॉपी, दिंडी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.