Talegaon Dabadhe : जनहित चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सामुदायिक मंगल परिणय सोहळ्यात सहा जोडपी विवाहबद्ध

तळेगाव दाभाडे- जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मावळ तालुक्यातील प्रथमच सामुदायिक मंगल परिणय सोहळ्यात सहा जोडपी सहभागी झाली होती. त्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी अनेक मान्यवरांसह सुमारे पाच हजार व-हाडी उपस्थित होते.

सदर सामुदायिक मंगल परिणय सोहळा तळेगाव स्टेशन येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेत संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस, वडगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, माजी नगराध्यक्ष सुलोचनाताई आवारे, अॅड रंजना भोसले, अॅड रवींद्र दाभाडे, राजेंद्र पोळ, यादवेंद्र खळदे, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, नगरसेवक रोहित लांघे, अनिता पवार, हेमलता खळदे, प्राची हेंद्रे, वैशाली दाभाडे, मंगल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या सोहळ्याचा मंगल परिणय विधी बौद्धाचार्य दालीतानंद थोरात, राजाराम साळवे,एम.एस.रोकडे व सहका-यांनी पार पाडला. यावेळी जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या मंगल परिणय सोहळ्यात सहभागी झालेल्या जोडप्यांना पूर्ण पोशाख,संसारपयोगी वस्तू,गॅस शेगडी सह सिलेंडर, दिवाण, मनगटी घड्याळ, शिलाई मशीन, संविधान उपादेशिका फ्रेम इतर भेट वस्तू देण्यात आल्या. व-हाडी मंडळींना भोजन व्यवस्था, नास्ता तसेच नववधुवरांची वाजत गाजत मिरवणूक ट्रस्टच्या वतीने काढण्यात आली होती.

मावळ तालुक्यातील हा पहिलाच मंगल परिणय सोहळ्याचा उपक्रम असून याचे संयोजन सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार, अध्यक्ष अजय भवार, सचिव सचिन कांबळे, कोषाध्यक्ष प्रवीण भवार, सल्लागार दादासाहेब यादव व सहका-यांनी केले होते. प्रास्ताविक प्राचार्य संभाजी मलघे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.