Pimpri : पिंपरीगावात ‘मोस्किटो किलिंग’ मशीन बसविण्याची मागणी

नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरीगावत पवना नदीवरील मिलेट्री डेअरी फार्म येथील कोल्हापुर पद्धतीचा बंधारा तोडण्यात आल्याने नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी पाण्याचे डबके तयार होऊन डासांच्या उत्पतीचे केंद्र बनत चालले आहे. याचा त्रास प्रभागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रभागामध्ये जलतरण तलाव, दशक्रिया विधी घाट, संजय गांधी नगर, बालामळ चाळ या परिसरामध्ये ‘मोस्किटो’ किलिंग मशिन बसविण्याची मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्र.21 मधील पवना नदीवरील मिलेट्री डेअरी फार्म येथील कोल्हापुर पद्धतीचा बंधारा काही वर्षापुर्वी तोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी पाण्याचे डबके तयार होऊन डासांच्या उत्पतीचे केंद्र बनत चालले आहे. त्यामुळे याचा त्रास प्रभागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रभागामध्ये जलतरण तलाव, दशक्रिया विधी घाट, संजय गांधी नगर, बालामळ चाळ या परिसरामध्ये ‘मोस्किटो’ किलिंग मशिन बसविण्यात यावे.

प्रभागात धुर फवारणीच्या गाड्याही नियमित येत नाहीत. यामुळे नागरिकांना आरोग्य विषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य विभाग नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. मोस्किटो किलिंग मशिन बसविणेबाबतचा ठराव मंजुर होऊन देखील एक वर्ष उलटून सुद्धा कोणतीच अंमलबजावणी झालेली नाही. या कामात दफ्तर दिरंगाई करणा-या अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी वाघेरे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.