Lonavala : दरडी काढण्याच्या कामामुळे आज पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर ब्लॉक

एमपीसी न्यूज- तळेगाव टोलनाका येथून जुन्या महामार्गाला जोडणाऱ्या मार्गिकेवरील उर्से खिंड येथील ढिले झालेले दरडीचे दगड काढण्याचे काम आज, मंगळवारपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी 10 ते दुपारी सव्वाचार वाजेपर्यंत हे काम चालणार आहे. 

दोन टप्प्यांमध्ये हे काम चालणार असून पहिल्या टप्प्यात मंगळवार दि. 14 मे ते शुक्रवार दि. 17 मे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मंगळवार दि. 21 मे ते गुरुवार दि. 23 मे दरम्यान काम चालणार आहे.

वरील तारखेला प्रत्येक तासाला पंधरा मिनिटे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गापासून जुन्या पुणे- मुंबई महामार्गाच्या दरम्यान उर्से खिंड येथून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी तसेच आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभागाकडून करण्यात आले आहे.

वाहतूक बंद ठेवण्यात येण्याची वेळ पुढीलप्रमाणे-

सकाळी-10 ते 10.15, 11 ते 11.15,
दुपारी- 12 ते 12.15, 1 ते 1.15 , 2 ते 2.15, 3 ते 3.15,
संध्याकाळी- 4 ते 4.15

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.