Balewadi : इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीगसाठी मुंबईचे राजे सज्ज

एमपीसी न्यूज- युवा व अनुभवी खेळाडूंचा मिश्रण असलेला मुंबईचे राजे हा संघ पहिल्या इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीगसाठी सज्ज झाला आहे. या लीगचे पहिले सत्र 13 मे ते 4 जून दरम्यान पुणे, मैसूर आणि बंगळुरू येथे आयोजित होणार आहे. द क्लायइव्हेंट आणि प्रमोशन्स प्रा.लि. यांनी मुंबईचे राजे हा संघ स्थापन केला आहे. प्रकाश साळुंखे आणि स्नेहा कर्नाळे या मुख्य प्रशिक्षकांचे मार्गदर्शन संघाला मिळणार आहे.

हरीश तावडे त्यांचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.या प्रशिक्षकानी यापूर्वी राज्यस्तरीय संघ आणि महाराष्ट्र पोलीसांच्या पुरुष व महिला कबड्डी संघांना मार्गदर्शन केले आहे. साळुंखे यांनी दुसऱ्या हंगामात पुणेरी पलटण आणि पाचव्या हंगामात जयपूर पिंक पँथर्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. त्यांनी अनेक आघाडीचे खेळाडू घडवले आहेत. त्या पैकी बी.सी. रमेश आणि सी. होनप्पा यांना अर्जुन पुरस्कार मिळाला.

शशांक वानखेडे हा संघातील सर्वोत्तम रेडर आणि बचावपटू आहे. या सोबत प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बंगाल वॉरियर्स आणि तेलगू टायटन्सकडून खेळण्याचा अनुभव त्याला आहे. यासोबत संघाकडे महाराष्ट्र पोलीसचे नेतृत्व करणारे राशीद शेख आणि देवेंद्र कदम सारखे खेळाडू आहेत. यांनी अखिल भारतीय पोलीस कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघात ते सहभागी होते.

पहिल्या हंगामातील संघाच्या तयारीबाबत बोलताना मुंबईचे राजे संघाचे सहमालक संजय सेलूकर म्हणाले, “गेल्या 25 दिवसांपासून मिरा भाईंदर स्पोर्ट्स क्लब येथेसंघसराव करत आहे. आमचा संघ मजबूत आहे आणि चांगल्या कामगिरीसाठी सर्व खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा आम्ही दिल्या आहेत. सर्व खेळाडू मेहनत घेत असून त्यांचा आत्मविश्वास देखील दुणावला आहे.

प्रशिक्षकांबाबत विचारले असता सहमालक डॉ. पी. व्ही. शेट्टी म्हणाले, आमच्याकडे प्रकाश, स्नेहा आणि हरीश सारखे चांगले प्रशिक्षक आहेत. ते नक्कीच संघाला चांगले मार्गदर्शन करतील याचा विश्वास आम्हाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संघ चांगली कामगिरी करेल.

संघाच्या कामगिरी बद्दल बोलताना सर्व प्रशिक्षक एकत्रितपणे म्हणाले की, अनुभवी खेळाडू आणि सरावात चमक दाखवणारे चांगले युवा खेळाडू आमच्याकडे आहेत. त्यामुळे आमचा संघ संतुलित आहे. सर्व खेळाडू फिट असून चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. प्रो कबड्डीमधून या लीगमध्ये सहभागी होण्याचा विचार केला या वर बोलताना त्यांनी सांगितले की, मुंबईचे राजेच्या संघ व्यवस्थापनाखाली खेळण्यास मिळत असल्याने आम्ही समाधानी आहोत. आम्हाला व्यवस्थापनाने फिजिओ, डॉक्टर, डायटीशियन, जिम या सुविधा पुरविल्या आहेत. या सोबतच अनेक गोष्टींची पूर्तता त्यानी केली आहे. सर्वच संघांनी अशाच सुविधा पुरविल्यास आम्ही नक्कीच प्रो कबड्डीला चांगली टक्कर देऊ.

मुंबईचे राजे

– मुख्य प्रशिक्षक : प्रकाश साळुंखे आणि स्नेहा कर्नाळे
– सहाय्यक प्रशिक्षक : हरीशतावडे

– संघ :

शशांक वानखेडे (महाराष्ट्र), विजय राजपूत (मध्यप्रदेश), मनीष शर्मा (हरयाणा), सुरेंदर दहिया (हरयाणा), आर. नागाराजू (आंध्रप्रदेश), मोहित नरवाल (हरयाणा),दिलजित सिंगचौहान (महाराष्ट्र), रवी देसवाल (हरयाणा), महेश तिमापूर (कर्नाटक), सुहास वागरे (महाराष्ट्र),राशीद शेख (महाराष्ट्र), मणी वीराकांथा (आंध्रप्रदेश), योगेश नवले (महाराष्ट्र), करम बिर (पंजाब), किरण एम (कर्नाटक), सौरवकुमार (बिहार), देवेंद्र कदम (महाराष्ट्र), ए. अरुल (पुदुचेरी), रोहितकुमार (हरयाणा)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.