Moshi : खोली रिकामी करण्यावरून घर मालकाकडून भाडेकरूला मारहाण

एमपीसी न्यूज – खोली रिकामी करण्याच्या कारणावरून भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये वाद झाला. यात  घर मालकाने भाडेकरूला शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास मोशी येथील तुपेवस्ती मध्ये घडली.

दत्तात्रय दगडू पाचंगे (वय 37, रा. तुपेवस्ती, मोशी) असे जखमी भाडेकरूचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राम सुरेश अवचीते (वय 35, रा. तुपेवस्ती, मोशी), शहा (पूर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय हे राम यांच्या खोलीत भाड्याने राहतात. त्यांच्यामध्ये रविवारी खोली रिकामी करण्याच्या कारणावरून भांडण झाले. या भांडणात घरमालक राम याने दत्तात्रय यांना शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण केली.

दरम्यान दत्तात्रय यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी आली असता त्यांनाही शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यामध्ये दत्तात्रय जखमी झाले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.