Nigdi: भक्ती-शक्ती चौकातील धोकादायक टॉवर हटविण्याची मागणी

एमपीसी न्यूज – निगडीतील भक्ती-शक्ती चौकामध्ये बरोबर मधोमध उच्चदाब विद्युतवाहिनाचा मोठा हायटेन्शन टॉवर उभा आहे. त्याच्या आजूबाजूला संपूर्ण खोदाईचे काम पूर्ण झालेले आहे. गेले अनेक दिवसापासून हे काम चालू आहे. हा टॉवर धोकादायक स्थितीत उभा आहे. अचानक जर मोठे वारे व पाऊस आल्यास हा टॉवर पडून मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे हा टॉवर त्वरित हलविण्यात यावा अशी मागणी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. निगडी भक्ती-शक्ती चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम जोरात चालू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदाईचे काम चालू आहे. चौकामध्ये मधोमध शहरातील मोठा हायटेन्शन टॉवर उभा आहे. त्याच्या आजूबाजूला संपूर्ण खोदाईचे काम पूर्ण झालेले आहे. गेले अनेक दिवसापासून हे काम चालू असून टॉवर काढण्याचे काम निविदा प्रक्रियेत अडकले आहे.

हा टॉवर इतका धोकादायक स्थितीत उभा आहे की अचानक जर मोठे वारे व पाऊस आल्यास हा टॉवर पडून मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने हा टॉवर लवकर हटवावा. टॉवर न हटविल्यास आणि काही जीवितहानी झाली. तर त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही चिखले यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.