Pune News : आठ महिन्यात महिला अत्याचाराचे तब्बल 983 गुन्हे

एमपीसी न्यूज : हाथरसच्या घटनेच्या निमित्ताने देशातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची यादी काढले असता पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत मागील आठ महिन्यात महिला अत्याचाराचे तब्बल 983 गुन्हे दाखल झाले आहेत. 

यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे ही आकडेवारी पाहता पुढारलेल्या पुणे जिल्ह्यातही महिला अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

संपूर्ण राज्यात सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील आठ महिन्यात बलात्काराच्या तब्बल 125 घटना उघडकीस आल्या आहेत. तर विनयभंगाच्या तब्बल 459 घटना घडल्या आहेत. त्याशिवाय अपहरणाचे ही 198 गुन्हे दाखल आहेत.  महिलांवरील अत्याचार सहन करणार नाही.

काही दिवसांपूर्वीच डॉ अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. आपला पदभार स्वीकारताना त्यांनी महिला अत्याचाराला कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशा घटनेतील आरोपींना तातडीने अटक करणे, त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करणे आणि आरोपीला शिक्षा मिळवून देण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.