Vadgaon Maval : सैनिकांच्या सन्मानासाठी युवकाची सायकलने भारत भ्रमंती

दिल्लीच्या आफताब फरेदीचे ध्येय; 'गिनेस बुक ऑफ रेकाॅर्ड' मध्ये होणार नोंद

एमपीसी न्यूज- जीवनाचे सार्थक करण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी ध्येय निश्चित करून त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळतेच. देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र देशाची सेवा करणा-या सैनिकांच्या सन्मानासाठी दिल्ली येथील 23 वर्षीय तरुण संपूर्ण भारतभर सायकलने भ्रमंती करीत आहे. आफताब फरेदी असे या तरुणाचे नाव आहे. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसुनही फक्त भारतीय सैनिकांना सन्मान मिळावा म्हणून तो भारतभ्रमण करत आहे.

शुक्रवारी सायंकाळी आफताब पुण्याहुन मुंबईला जात असताना वडगावात पोहचला असता त्याचे स्वागत वडगाव मावळ येथे करण्यात आले.
वडगावचे प्रथम नगराध्यक्ष मयूर ढोरे व सामाजिक कार्यकर्ते बिहारीलाल दुबे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते संजीव सुळे, नगरसेवक राजेंन्द्र कुडे, मा. उपसरपंच विशाल वहिले, आफताब सय्यद अध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चंद्रकांत ठोंबरे, नेताजी सावंत, रामचंद्र हुलावळे, मयूर वाघमारे, सोमनाथ धोंगडे, सुनील दंडेल, अक्षय रौंधळ आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

दिल्ली येथील इंडिया गेट येथुन 26 आॅगस्ट 2018 रोजी भारत भ्रमणासाठी आफताब सायकलने निघाला. आज त्याच्या प्रवासाचा 242 वा दिवस होता त्याने आजपर्यंत भारतातील गुजरात व राजस्थान सोडून संपूर्ण राज्यांचा प्रवास पूर्ण केला आहे. 15 जुनपर्यंत त्याचा हा प्रवास पूर्ण होऊन त्याने आतापर्यंत 23 हजार 950 की.मी. एवढे अंतर कापले असुन तो दररोज शंभर ते दिडशे की.मी. प्रवास करीत आहे.

15 जुन रोजी 30000 की.मी. पूर्ण करुन त्याची ही भारत भ्रमण यात्रा दिल्ली गेट येथे संपणार आहे व ‘गिनेस बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्येही नोंद करणार असल्याचे त्याने सांगितले. हा प्रवास अतिशय खडतर व आव्हानात्मक आहे. रोजच्या या धकाधकीच्या जीवनात आपले अस्तित्व टिकवणे कठीण असताना आफताब फरेदी सैनिकांचा सन्मान आणि देशाचे नाव सायकल स्वारीत मोठे करण्यासाठी निघाला आहे.

आपल्या सायकल भ्रमंतीबाबत बोलताना आफताब म्हणाला, ” ध्येयाने झपाटलेला माणुस काहीही करु शकतो. मी माझे ध्येय निश्चित केले आणि ते पुर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. रस्त्यावर गवत खाऊन राहिलो, कधी कधी ऊपाशी प्रवास केला, कधी मंदिरात तर कधी स्मशानभूमीत झोपलो, फक्त लोकाच्या मदतीने माझा हा प्रवास चालू आहे. शेवटी सैनिकांचा आत्मसन्मान आणि देशाचे नाव मोठे करण्यासाठी माझी ही लढाई चालू आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.