Thergaon : भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयग्रस्त

एमपीसी न्यूज- थेरगाव मधील दत्तनगर परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी खूप दहशत माजवली असून अनेक नागरिकांना त्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी थेरगाव सोशल फौंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

मंगळवारी (दि. २०) भर दुपारी दत्तनगरमध्ये एका लहान मुलावर काही कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन कुत्री या लहान मुलाला अक्षरशः ओढुन नेत होते. या हल्ल्यामध्ये हा मुलगा गंभीर जखमी झाला. थेरगाव सोशल फौंडेशनचे सदस्य मुसावीर सोंडे यांनी त्या मुलाला त्वरित तालेरा रुग्णालयात भरती केले.

राहुल सरवदे यांनी महापालिकेचे पशुवैदयकिय अधिकारी यांच्याकडे तक्रार करून त्यांना डाॅग व्हॅन पाठविण्याची मागणी केली. आज, मंगळवार सकाळपासुनच युवराज पाटिल, मुसावीर सोंडे, महेश येळवंडे व डाॅग व्हॅनच्या कर्मचाऱ्यांनी कुत्र्यांचा शोध घेऊन दुपारी १२ च्या सुमारास दोन कुत्र्यांना पकडले. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.