Hinjawadi : बंद पडलेल्या ट्रकमधून गोडेतेलाचे 99 डबे चोरीला

एमपीसी न्यूज – गोडेतेलाचे डबे घेऊन जाणारा ट्रक बंद पडला. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी ट्रकमधून गोडेतेलाचे 99 डबे चोरून नेले. ही घटना 3 ते 6 मार्च या कालावधीत देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर योगी हॉटेलसमोर घडली.

मुजाहिद कमरुद्दीन खान (वय 30, रा. देवेसराम, ता. गोवर्धन, जि. मथुरा, उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान हे ट्रक चालक आहेत. ते मुंबईकडून पुण्याकडे जेमिनी कंपनीच्या गोडेतेलाचे 15 लिटरचे डबे घेऊन जात होते. 3 मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता त्यांचा ट्रक देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर योगी हॉटेलसमोर बंद पडला. बंद पडलेल्या ट्रकचे काम करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी गेला. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ट्रक मधून गोडेतेलाचे 99 हजारांचे 15 लिटरचे 99 डबे चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.