Pimpri : राष्ट्रवादीचा ‘गड आला पण सिंह गेला’; 50 वर्षांत पहिल्यांदाच बारामतीत जल्लोष नाही

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा दारुण पराभव झाला. तब्बल दोन लाख 17 हजार 763 मतांनी पार्थला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर, दुसरीकडे पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमधून शरद पवार यांच्या कन्या, अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून येत बालेकिल्ला शाबूत ठेवला. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी काहीशी परिस्थिती राष्ट्रवादीची झाली. गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच बारामतीत विजयी जल्लोष झाला नाही.

मावळ मतदारसंघातून पार्थ यांचा राजकारणाच्या पहिल्या पदार्पणातच पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या राजकीय करिअरला ‘ब्रेक’ लागला. पवार घराण्यातील तिस-या पिढीला जनतेने सपशेल नाकारले. गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच पवार परिवाराला पराभव पहावा लागला. सर्वांत महत्वाचे म्हणजे दोन लाखाच्या मताने पवार कुटुंबातील सदस्याचा पराभव होणे हे धक्कादायक मानले जात आहे.

बारामतीमध्ये 2014 मध्ये कमी मताधिक्याने निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पाच वर्ष मतदारसंघ पिंजून काढला. मतदारसंघात त्यांनी लक्ष दिले होते. त्यामुळे यावेळी सुळे दीड लाख मताच्या फरकाने निवडून आल्या. भाजपने ‘कुल’ खेळी केली होती. परंतु, सुळे यांनी भाजपची खेळी उधळवून लावली. भाजपची रणनीती हाणून पाडली. सुळे निवडून आल्या परंतु पार्थ पवार पडले. त्यामुळे त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी काहीशी परिस्थिती राष्ट्रवादीची झाली. बारामतीत सुळे मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन पण विजयी जल्लोष साजरा केला नाही. गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच बारामतीत विजयी जल्लोष झाला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like