BNR-HDR-TOP-Mobile

Pimple Saudagar : राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त विठाई वाचनालयास पुस्तके भेट

एमपीसी न्यूज – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपळे गुरव येथील राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन संचलित विठाई वाचनालयास अनेक ऐतिहासिक पुस्तके भेट देण्यात आली.

राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश नवले यांच्या हस्ते उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्याकडे पुस्तके सुपूर्द करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विवेक तितरमारे, जयराम शिंदे, रमेश वाणी, महेश गवस, रवींद्र पाटील, प्रतीक नवले, अजय खराडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

भारताचे संविधान, शोध राजीव हत्येचा, छत्रपती श्रीशिवाजी महाराज, क्षत्रिय मराठे, जयभीमचे जनक – बाबू हरदास, एल एन, सुभेदार रामजी आंबेडकर, आंबेडकर गांधी तीन मुलाखती आदी पुस्तके भेट देण्यात आली.

संजय भिसे म्हणाले,” सध्याच्या धावपळीच्या तंत्रज्ञानाच्या युगात माणसाला पुस्तके वाचण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तरुण पिढीला वाचण्याची गोडी लागावी म्हणून विठाई वाचनालयाची सुरुवात करण्यात आली “वाचाल तर वाचाल” त्यामुळे रोज किमान एक तास तरी आवडेल ते पुस्तक वाचले पाहिजे” त्यामुळे माणसाच्या सामान्य ज्ञानात भर पडते .

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3