Pune : एमएनजीएलने केला पीएमपीएमएलचा सीएनजी पुरवठा बंद

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) चा पुरवठा आजपासून (दि. 24 मे) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्याची लाईफलाईन असणाऱ्या पीएमपीच्या ताफ्यातील सीएनजीवर चालणाऱ्या 1 हजार 235 बसेस बंद पडणार आहेत.

मागील 2 वर्षापासून पीएमपीएमएल कडे असलेली थकबाकी आजमितीस रुपये ४७ कोटी २२ लाख पर्यंत पोहोचली आहे. याबाबत एमएनजीएलकडून वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र थकबाकी कमी करण्याबाबत पीएमपीएमएलकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.