Maval : कुटुंबात पहिल्यांदाच पराभव; ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’; शरद पवार यांची भावनिक पोस्ट

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीचा गड राखला. पण मावळ लोकसभा मतदारसंघातून नातू पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले. पार्थच्या पराभवाने पवारांच्या कुटुंबाला पहिल्यांदाच हार पहावी लागली आहे. त्यावर ‘थकलो आहे जरी, अजून मी झुकलो नाही आणि जिंकलो नसलो तरी अजून मी हरलो नाही’, अशा आशयाची भावनिक पोस्ट ‘इन्स्टाग्रामवर’ टाकत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना न खचण्याचे आवाहन केले आहे.

शरद पवार यांची 50 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. आतापर्यंत लढविल्या 14 ते 15 निवडणुकीत एकदाही त्यांचा पराभव झाला नाही. पुतणे अजित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांनी आजपर्यंत पराभव पाहिला नाही. परंतु, मावळ लोकसभा मतदारसंघातून पवार कुटुबांच्या तिस-या पिढीला पराभावला सामोरे जावे लागले.

शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला. पार्थ यांच्या पराभवाने पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले. पवार कुटुंबातील सदस्यांचाच पराभव झाल्याने पक्षाच्या कार्यकर्ते खचून जाऊ नयेत. त्यांचे मनोबल कमी होऊ नये यासाठी शरद पवार यांनी भावनिक पोस्ट करत न खचण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

शरद पवार यांनी ‘इन्स्टाग्रामवर’ धन्यवाद अशी पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ”थकलो आहे जरी अजून मी झुकलो नाही, जिंकलो नसलो तरी अजून मी हरलो नाही, अरे संकटानो अजून दम लावा, कारण कमी पडलो असलो तरी अजून मी संपलो नाही’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like