Pune : बारावीचा निकाल पाहण्यासाठी इथे भेट द्या

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 85.80 टक्के

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल 85.80 टक्के लागला असून कोकण विभागाचा सर्वाधिक 93.23 तर सर्वात कमी नागपूरचा 82.51 टक्के निकाल लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली.

विद्यार्थ्यांना आज, मंगळवारी दुपारी एक वाजल्यानंतर www.hscresult.mkcl.org, mahresult.nic.in, www.maharashtraeducation.com,  या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल. www.mahresult.nic.in/hsc2018/hsc2018.htm

महाराष्ठ्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी – मार्च 2019 मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 फेब्रुवारी 2019 ते 18 फेब्रुवारी 2019 या कालावधीत तर लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या कालावधीत पार पडली. या परीक्षेच्या दरम्यान प्रमुख विषयांच्या लेखी परीक्षेच्या दरम्यान किमान एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता. मागील वर्षीपेक्षा यावर्षी 2.53 टक्क्यांनी निकाल घसरला आहे.

यंदा इयत्ता 12 वीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. यंदा कोकण विभागाचा निकाल 93.23 टक्के इतका लागला आहे. तर, पुणे विभागाचा निकाल 87.88 टक्के, अमरावती विभागाचा 87.55 टक्के, कोल्हापूर विभागाचा 87.12 टक्के, लातूर विभागाचा 86.08 टक्के, नाशिक विभागाचा 84.77 टक्के, मुंबई विभागाचा 83.85 टक्के, तर नागपूर विभागाचा 82.51 टक्के निकाल लागला आहे.

यंदा 12 वीच्या परीक्षेला राज्यभरात एकूण 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थी बसले होते. यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 8 लाख 42 हजार 919 तर विद्यार्थिनींची संख्या 6 लाख 48 हजार 151 इतकी होती. राज्यातील तब्बल 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. शाखेनुसार विचार करता यंदा विज्ञान शाखेचा निकाल 92.60 टक्के, वाणिज्य शाखेचा 88.28 टक्के आणि कला शाखेचा निकाल 75.45 टक्के लागला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.