Dehugaon : जोग महाराज यांच्या महानिर्वाणदिनाच्या शताब्दी वर्षानिमित्त कीर्तन सप्ताह उत्साहात

एमपीसी न्यूज- श्रीक्षेत्र भंडारा डोंगर याठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे संस्थापक सद्गुरु जोग महाराज यांच्या महानिर्वाण दिनाच्या शताब्दी वर्षानिमित्त ह भ प सदाशिव महाराज साखरीकर यांनी दि 20 मे ते 26 मे या कालावधीत मोठा सप्ताह केला.

पहाटे काकडा, सकाळी साडेसहा ते दुपारी एक गाथा पारायण एक ते तीन भोजन, तीन ते चार श्री विठ्ठल जप, चार ते पाच प्रवचन, पाच ते सहा हरिपाठ, सहा ते आठ सायंकाळी किर्तन, नंतर अन्नदान हरिजागर असा सप्ताहाचे नियोजन झाले.

त्यामध्ये खानदेश विदर्भ असे 900 भाविक उपस्थित होते. त्याप्रसंगी प्रसंगी महाराष्ट्र वारकरी संप्रदाय ह भ प गुरुवर्य परमपूज्य शांतिब्रह्म मारुती महाराज कुरेकर बाबा वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचे कीर्तन झाले. गाथा मूर्ती हरिभक्त पारायण रामचंद्र बोधे यांचे गायन जनार्दन महाराज गावंडे तात्या यांचा विठ्ठल जप असा आनंदाचा कार्यक्रम पार पडला 26 मे रोजी दुपारी चार ते सहा महाराष्ट्राचे गायनाचार्य ह भ प पंढरीनाथ महाराज आरू यांचे काल्याचे कीर्तन झाले.

त्यानिमित्ताने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थान आणि संत तुकाराम भक्त निवास यांच्यावतीने ह भ प सदाशिव महाराज साखरिकर यांनी हा योग जुळून आणला म्हणून ह भ प मारूती महाराज कुरेकर बाबा वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या हस्ते तसेच श्रीक्षेत्र भंडारा डोंगरचे विश्वस्त रामभाऊ कराळे पाटील, सेक्रेटरी जोपाशेठ पवार, शांताराम काळे पाटील, संतोष तरस, अजित कराळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.