Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 86.87%

विज्ञान शाखेत मिहीरा काशीद, वाणिज्य शाखेत केतकी सातपुते तर कला शाखेत मंगल केंगले प्रथम

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 86.87 टक्के लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा 92.63 टक्के, कला शाखेचा 64.61 टक्के, वाणिज्य शाखेचा 88.21 टक्के निकाल लागला आहे. मिहिरा शिवाजी काशिद ही विद्यार्थिनी विज्ञान शाखेत प्रथम, वाणिज्य शाखेमध्ये केतकी विघ्नेश सातपुते तर कला शाखेमध्ये मंगल तुकाराम केंगले प्रथम आली आहे. यंदा महाविद्यालयातून एकूण 518 मुलांनी परीक्षा दिली यामधून 450 मुले उत्तीर्ण झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी दिली.

विज्ञान शाखेमध्ये मिहीरा शिवाजी काशीद (89.23 %) प्रथम, सुमित संजय वाघ (82.77 %) द्वितीय, सृष्टी उमेश मोघे (79.08 %) आणि संपदा कारभारी शिंदे (79.08 %) यांचा तृतीय. वाणिज्य शाखेमध्ये केतकी विघ्नेश सातपुते (87.69%) प्रथम, पुजा सुदाम बधाले (84 %), द्वितीय, प्रिया दत्तात्रय ढोरे (83.38 %), कला शाखेमध्ये मंगल तुकाराम केंगले (83.53 %) प्रथम, कोमल परमेश्वर सोनुने (68.46 %) द्वितीय, श्रुती संभाजी टक्केकर (66.61 %) तृतीय, तंत्रशिक्षण शाखेमध्ये तन्मय दिनेश राजे (71.79 %) प्रथम, वैष्णवी बाळू जाधव (71.38 %) द्वितीय, दिव्या गोरख फल्ले (69.53 %) तृतीय क्रमांकावर या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, सचिव रामदास काकडे, खजिनदार चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, विज्ञान शाखेचे प्रमुख यु.एस.खाडप, परीक्षा विभागाचे प्रमुख प्राचार्य एस.पी.भोसले, यु.व्ही.भोसले, एन.टी.भोसले, उपप्राचार्य एस.एस.ओव्हाळ सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.