Nigdi News : भर दिवसा 17 वर्षीय मुलावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – यमुनानगर, निगडी येथील अपंग शाळेसमोरील रस्त्यावर तिघांनी मिळून 17 वर्षीय मुलावर कोयत्याने वार करत मारहाण केली. तसेच कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना बुधवारी (दि. 13) दुपारी पावणे चार वाजता घडली.

मयूर बाळू घोडके (वय 17, रा. ओटास्कीम, निगडी) असे जखमी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी गुरुवारी (दि. 14) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओमकार चंदनशिवे (वय 21, रा. रुपीनगर, चिखली), योगेश गालफाडे (वय 19, रा. त्रिवेणीनगर, चिखली), सिद्धू वतारे (वय 19, रा. त्रिवेणीनगर, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे मागील काही दिवसांपूर्वी दुस-या गटातील मुलांसोबत भांडण झाले होते. फिर्यादी मयूर हे त्या गटातील असल्याचा संशय आरोपींना होता. त्यावरून बुधवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास शाळेसमोरील रस्त्यावर आरोपींनी मयूर यांच्या डोक्यात कोयता मारून जखमी केले. त्यानंतर हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी ओमकार याने कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. या दहशतीमुळे कॉलेजमधील मुले रस्त्याने सैरावैरा पळू लागली. याप्रकरणी निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.