Nigdi Crime News : अनधिकृत पोट माळ्याला लागलेल्या आगीत 25 वर्षीय तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दहा महिन्यांनी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अनधिकृतपणे बांधलेल्या पोट माळ्याला लागलेल्या आगीत 98 टक्के भाजलेल्या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोघांवर दहा महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.21/12/2020   रोजी गळा नंबर  ४ एलआयसी बिल्डिंग यमुनानगर, निगडी येथे  सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. 

अंकित अनिल अगरवाल (वय 25) असे आगीत भाजून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी विनोद बगेश्वर पाठक ( वय 45, रा. यमुनानगर, निगडी) आणि अजित बाळकृष्ण कुलकर्णी (वय 42) या दोघांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद पाठक याने आपल्या मुळ गाळ्यात अनधिकृतपणे पोटमाळा तयार केला व तो अंकित याला राहण्यासाठी दिला. दि.21/12/2020सकाळी सातच्या सुमारास या गाळ्याला अचानक लागलेल्या आगीत अंकित 98 टक्के भाजला व त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.