Loni Kalbhor News : अज्ञात वाहनाच्या धडकेत 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज : रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका 48 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झालाय. लोणी काळभोर गावच्या हद्दीतील बोरकर वस्ती येथील पेट्रोल पंपासमोर बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

_MPC_DIR_MPU_II

विठ्ठल पांडुरंग काळे (वय 48) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी योगेश विठ्ठल काळे (वय 27, रा वाघेली वस्ती, लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विठ्ठल पांडुरंग काळे हे बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बोरकर वस्ती येथील पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडत असताना  भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाची त्यांना जोराची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विठ्ठल काळे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.