Pimpri: खराळवाडीतील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

A 65yr old woman from Kharalwadi, Pimpri, she was corona positive covid19 patient

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खराळवाडी येथील कोरोना बाधित 65 वर्षीय महिलेचा आज (बुधवारी) मृत्यू झाला आहे.  दरम्यान, कोरोनामुळे शहरातील सात आणि पुण्यातील पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नऊ अशा 16 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

खराळवाडी येथील महिलेला कोरोनाची लागण झाली होती. महिलेचे वय 65 होते. महापालिका रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेचा आज मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल!

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 123

# पॉझिटीव्ह रुग्ण – 07

#निगेटीव्ह रुग्ण – 33

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 200

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 290

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 40

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 240

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 84

_MPC_DIR_MPU_II

# शहरातील कोरोना बाधित 12 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  16

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 138

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 35365

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 108025

रावेत, रहाटणी, वाल्हेकरवाडीतील ‘हा’ परिसर सील!

रावेत परिसरात आज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आकाशराज हौसिंग गृहनिर्माण सोसायटी येथील (वास्तु इंपेरियल समोर-औंध रावेत बीआरटी रोड-श्री गणेशा एंटरप्रायईज कंपनी लि- वास्तु रिव्हर नेस्ट समोर), श्रीकृष्ण कलनी रहाटणी येथील (हरिकृपा दुध डेअरी-काळेवाडी रहाटणी रोड-श्रेया मेडिकल-दत्त मंदिर-गुरुकृपा ट्रेडिंग)

वाल्हेकरवाडीतील (इंपेरिया हाईट्स समोर-एचडीएफसी बँक एटीएम-महालक्ष्मी मेडिकल- जीजामाता चौक- स्वरा मेडिकल-रेणुका अपार्टमेंट- सिल्वर अक्षय सोसायटी समोर- डी.वाय.पाटील कॉलेज मागील बाजू) हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.

या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.