Nigdi : सोसायटीच्या पार्किंगमधून सायकल चोरीला

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने सायकल चोरून नेली. ही घटना निगडी येथील सिद्धीविनायक सोसायटी येथे 15 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. 

मीनाक्षी प्रवीण पाटील (वय 45, रा.सिद्धिविनायक सोसायटी, आशीर्वाद कॉलनी, निगडी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीनाक्षी यांची मुलगी समृद्धी हिची सायकल तिने सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावली. रविवारी (दि. 15) दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सायकल चोरून नेली. याबाबत मीनाक्षी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.