Pune News : रेल्वे खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाला चार लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज : रेल्वे खात्यात तिकीट तपासणीस किंवा क्लार्क पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने एका तरूणाला ३ लाख ७५ हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी मिनाज मुर्तजा शेख (रा. मार्केटयार्ड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. चैत्राली गणेश गायकवाड (वय ३०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनाज आणि चैत्राली एकमेकींच्या ओळखीचे आहेत. मिनाजने चैत्रालीचा भाउ अक्षय घोडेकरला रेल्वेत तिकीट तपासणीसची नोकरी लावण्याची बतावणी केली. त्यासाठी तिने अक्षयकडून ३ लाख ७५ हजार रूपये गुगल पेद्वारे स्वीकारले. रक्कम स्वीकारूनही नोकरी न लावल्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी मिनाजविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश चव्हाण तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.