-MPC-TOP-MOST-BANNER-I

Nigdi News : साईनाथ नगरमध्ये शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – साईनाथनगर निगडी येथे इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे तीन मजली इमारतीला आग लागली. ही घटना आज (गुरुवारी दि. 22) पहाटे दीड वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

साईनाथनगर निगडी येथे नगरसेवक सचिन चिखले यांच्या कार्यालयाजवळ गावंडरे याची तीन मजली इमारत आहे. या संपूर्ण इमारतीमध्ये भाडेकरू राहतात. गुरुवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास इमारतीच्या खालील भागात इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

आगीचा प्रचंड धूर इमारतीत पसरला. सर्व खोल्यांमध्ये धूर पसरल्याने भाडेकरू तरुण बाहेर आले. सुमारे 50 ते 60 भाडेकरू तरुणांनी मिळेल त्या दिशेने उड्या मारून आपला जीव वाचवला. दरम्यान स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिलीन त्यानंतर अडीच वाजताच्या सुमारास एक बंब घटनास्थळी दाखल झाला. काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शॉर्टसर्किटने आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn