Wakad : बंद घराची टेहळणी करून घरफोडी करणारा जेरबंद

अडीच लाखांचा ऐवज जप्त; पाच गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – पायी फिरून बंद असलेल्या घरांची टेहळणी करून घरफोडी करणा-या आरोपीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून घरफोडीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 47 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

शुभम शिवानंद स्वामी (वय 19, रा. वडवळ नागनाथ, राम मंदिराजवळ, ता. चाकूर, जि. लातूर), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून त्याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे तपास पथक आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाला एक संशयित तरुण रघुनंदन पेट्रोल पंपाच्या शेजारी उभा असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने वाकड, थेरगाव आणि काळेवाडी परिसरात चो-या केल्याचे कबूल केले. शुभम वाकड, थेरगाव आणि काळेवाडी परिसरात पायी फिरून बंद असलेल्या घरांची टेहळणी करायचा. घर बंद असल्याचे निश्चित झाल्यास तो घरात घुसून चोरी करत असे. यावरून त्याला अटक करण्यात आली.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या तपासातून वाकड पोलीस ठाण्यातील घरफोडीचे पाच गुन्हे उघड झाले आहेत. शुभमकडून 80.5 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, एक मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 47 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उपआयुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी अन्वर मोमीन, बिभीषण कन्हेरकर, धनराज किरनाळे, दादा पवार, हनुमंत राजगे, अशोक दुधवणे, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, विक्रांत गायकवाड, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, महम्मद गौस नदाफ, राजेंद्र बारशिंगे, भैरोबा यादव, गणेश गिरी गोसावी, शाम बाबा, नितीन गेंगजे, मधुकर चव्हाण, सागर सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.