Business Fraud News: चाकणमध्ये एका व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : एका व्यापाऱ्याची 19.60 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पीडित व्यापारी प्रशांत साठे वय 41 वर्षे, रा. धायरी पुणे मुळ रा. सोलापुर यांनी चाकण (म्हाळुंगे) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल आरदवाड, मॅनेजिंग डायरेक्टर, उनाटेक सोल्युशन प्रा. लि. पत्ता पी ए पी ओ 6/2 चाकण एमआयडीसी फेज 4, तालुका खेड, जिल्हा पुणे त्यांच्या विरोधात भा.द.वि कलम 420, 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी आरदवाड यांनी 3 सप्टेंबर रोजी निघोजे गावच्या हद्दीत उनाटेक सोल्युशन्स प्रा.लि. येथे फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादीकडे 1) शीट मशीन डाय सह, 2) सी पी व्ही पाईपिंग, 3) कूलिंग टॉवर,  4) 4 कोअर केबल, इलेक्ट्रिक वस्तू,  कॅपसीटर  एम सी बी, 5) वॉशर विथ मोटर, 6) ड्रायर मोटारसह, 7) मिक्सर मोटार सह, 8) ग्रँनहुलेस मशीन व साहित्य, 9) कॉम्प्रेसर मोटर, 10) व्हॅक्युम फोरमिंग मशीन 1, 2, 3 तसेच 11) ग्राइंडर मशीन 2  तसेच 12) चिल्लर 2 व 13) वेल्डिंग मशीन व इतर सर्व साहित्य असे एकूण 28 लाख रुपये किंमतीचा खरेदी करण्याचा बहाणा करून त्यापैकी 8 लाख 40 हजार रुपये फिर्यादीच्या खात्यावर जमा केली. उर्वरित रक्कम वेळोवेळी मागणी केली असता ती दोन दिवसात देतो असे सांगून टाळाटाळ करून उर्वरित रक्कम 19.60 लाख रुपये न देता वरील वस्तू ताब्यात ठेवून विश्वासघात करून फिर्यादीची फसवणूक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.