Pimpri : कार-दुचाकीच्या धडकेत तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी दहाच्या सुमारास मोहननगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित शांताराम थोरात (वय 40, रा. एसकेएफ कॉलनी, चिंचवड), असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे. गोरख बच्चन गुप्ता (वय 21), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. बच्चन भगवानदास गुप्ता (वय 47, रा. मोई फाळके वस्ती, ता. खेड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास मयत गोरख त्याच्या दुचाकीवरून (एम एच 14 / बी एस 0227) टेल्को रोडने जात होता. बसवेश्वर चौकाजवळ देना बॅंकेसमोर आला असता भरधाव वेगात आलेल्या कारने (एम एच 14 / जी एस 0859) दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात गोरख गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.