Mahalunge : परवानगी शिवाय गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजीत केल्या प्रकरणी आयोजकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – पोलिसांची परवानगी नसताना आयोजकाने गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम आयोजीत केल्याने महाळुंगे (Mahalunge) एमआयडीसी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा कार्यक्रम मंगळवारी (दि.30) सायंकाळी मोई येथे आयोजीत केला होता.

Pimpri : महापालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

याप्रकरणी समीर रामदास गवारे , आनंद चिंतामण गवारे आणि विश्वनाथ शांताराम गवारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजकांनी संबंधीत कार्यक्रमा संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत या कार्यक्रमाला महाळुंगे (Mahalunge) पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीदेखील परवानगी नसताना समीर रामदास गवारे, आनंद चिंतामण गवारे आणि विश्वनाथ शांताराम गवारे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला म्हणून त्यांच्यावरती भा.दं. वि कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आधीही 21 मे रोजी भोसरी पोलीस ठाण्यात परवानगी शिवाय गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजीत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.