Dighi : आरडाओरडा करून धिंगाणा घालणाऱ्या टोळक्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विजयनगर दिघी येथील एका दुकानाबाहेर मोठमोठ्याने आरडाओरडा करत धिंगाणा घालणाऱ्या पाच जणांच्या टोळक्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.
Wakad : सुनेकडून सासूला मारहाण
ताबिश मोहम्मदअली शेख (वय 30), दत्तात्रय संजय कदम (वय 26), शुभम विनोद खत्री (वय 22, तिघे रा. विश्रांतवाडी पुणे), ऋषिकेश रवींद्र दळवी (वय 20), जुबेर जाकीर खान (वय 36, दोघे रा. येरवडा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अनिल दौंडकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चारचाकी वाहन घेऊन दिघी मधील विजयनगर येथे आले. त्यांनी एका दुकानासमोर मोठमोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घातला. आरोपींनी सार्वजनिक शांततेचा भंग केला. पोलिसांनी आरोपींच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये दोन हॉकी स्टिक आढळून आल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.