Pimpri: महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

A case has been registered against a man for molesting a woman पीटर फिलिक्स (वय 55, रा.डेअरी फार्म रोड, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमपीसी न्यूज- महिलेचा पाठलाग करून विनयभंग केला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 30 मार्च ते 1 जुलै 2020 या कालावधीत पिंपरी येथे घडली.

पीटर फिलिक्स (वय 55, रा.डेअरी फार्म रोड, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेचा पाठलाग करून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करून अश्लील शब्दात बोलून त्यांचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like