_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : पंतप्रधान आणि योगी आदित्यनाथ यांची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा सचिव आणि स्वाभिमानी होलार समाज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा सचिव मोहसीन ए शेख आणि स्वाभिमानी होलार समाज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनीत भरत कुमार बाजपेयी (वय 38) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फेसबुक या समाज माध्यमावर नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो आक्षेपार्हरीत्या मॉर्फ करून प्रसिद्ध केले आहेत. वरील आरोपींनी घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लोकविकास बाधा आणणारे सत्य जाणून-बुजून करून त्यांची बदनामी केली त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.