सोमवार, फेब्रुवारी 6, 2023

Social Media : अल्पवयीन मुलांचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीने त्याच्या सोशल मिडीया (Social Media) अकाउंटवरून एका अल्पवयीन मुलाचा आणि मुलीचा अश्लील व्हिडीओ अपलोड केला. याप्रकरणी सोशल मिडिया अकाउंट धारक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 जुलै 2021 रोजी सकाळी पावणे सात वाजता निघोजे येथे घडला.

राहुल आलम (रा. निघोजे, ता खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर यांनी चाकण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 20) फिर्याद दिली आहे.

Talera Hospital : तालेरा हॉस्पिटलमध्ये भीषण आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवरून 1 जुलै 2021 रोजी सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाचा आणि मुलीचा अश्लील व्हिडीओ अपलोड केला. हा प्रकार संबंधित यंत्रणांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यांनतर हा गुन्हा दाखल (Social Media) करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Latest news
Related news