Dighi Crime News : विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या मुलांच्या मागे येऊन विवाहितेसोबत जवळीक साधून प्रेम संबंध निर्माण केले. विवाहितेकडून चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन ते परत दिले नाहीत. त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत विवाहितेच्या पतिला समजल्यानंतर देखील आरोपीने विवाहितेचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग केला. तसेच विवाहितेसोबतचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय राजेंद्र फुलवरे (वय 25) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 9) फिर्याद दिली.

हा प्रकार सन 2017 ते 9 मे 2021 या कालावधीत पाझर तलाव, बुर्डे वस्ती गणपती मंदिराच्या शेजारी च-होली येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलांच्या मागे येऊन आरोपीने फिर्यादी महिलेशी जवळीक साधली. त्यातून महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. महिलेकडून साठ हजार रुपये किमतीचे चार तोळे सोन्याचे दागिने घेतले. घेतलेले दागिने विवाहितेला परत दिले नाहीत. विवाहितेसोबत वारंवार गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.

दरम्यान, या प्रेमसंबंधाबाबत विवाहितेच्या पतीला समजल्यामुळे विवाहितेने आरोपीला समजावून सांगितले. तरी देखील त्याने वारंवार विवाहितेचा पाठलाग केला. विवाहितेने आरोपी सोबत बोलण्यास नकार दिला असता त्याने त्यांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.