Lonaval News : लोणावळ्यात भटक्या कुत्र्यांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे.गोल्ड व्हॅली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर चार जणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रियंका व्हिस्पी बालापोरीया (वय 31 वर्षे व्यवसाय पेटशॉप रा. बंगलो नं 1516, स्वारंग सोसायटी गोल्डव्हॅली सेक्टर डी न्यू   तुंगार्ली लोणावळा मावळ जि पुणे. मुळ रा. बी 8 कॅप्टन कॉलनी हजिअली मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन विदप्पा आहिरे, राजेष गणेश आचार्य, संजय वासु आचार्य, मोहन यादव (सर्व रा. स्वारंग सोसायटी गोल्डव्हॅली सेक्टर डी. न्यु तुंगार्ली लोणावळा ता. मावळ जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली.7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास स्वारंग सोसायटी येथील बंगला नं 12 से गेटचे जवळ या चोघांनी संगनमत करून काही कारण नसताना काही भटक्या जातीच्या कुत्र्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून मुक्या प्राण्यांना कुरतेने वागणुक दिली.

त्यापैकी तीन कुत्र्यांना विकलांग करून आगळीक करून त्यापैकी एका काळ्या रंगाच्या कुत्र्याला लाकडी दांडक्याने तोंडावर, पायावर जबर मारहाण करून ठार मारले व या कुत्र्याचा मृतदेह अज्ञात स्थळी टाकून व्हिलेवाट लावली आहे.म्हणून माझी या व्यक्तींविरूध्द कायदेशीर फिर्याद आहे असे प्रियंका बालापोरीया यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.त्यांच्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अबनावे यांनी गुन्हा दाखल केला असून हवालदार लक्ष्मण उंडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.