Extortion Case: खंडणी मागत हॉटेल चालकाची बदनामी केल्याप्रकरणी सात जणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बेकायेशीररित्या दारू विक्री करतो, म्हणत हॉटेल चालकाला खंडणी मागणाऱ्या सात जणांवर देहुरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 28) दुपारी देहूरोड येथील शंतनू उपहार गृहात घडला.

याप्रकरणी हॉटेल व्यवसायीक प्रमोद अरुण अवघडे (वय 35, रा. शीतळानगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि.1) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीजित रमेशन, अडम (पुर्ण नाव माहिती नाही) व आणखी पाच जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC: बेकायदेशीर, नियमबाह्य पद्धतीची ‘जॅकवेल’ची निविदा रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाणार – सीमा सावळे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अवघडे हे देहूरोड येथे हॉटेल चालवतात. सोमवारी दुपारी श्रीजित रमेशन हा त्याच्या साथीदारांसोबत फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये आला. त्याने दारूची बाटली टेबलावर ठेवली. हॉटेलमधील कामगाराने हॉटेलमध्ये दारू पिण्यास आरोपींना मनाई केली. त्यावेळी आरोपींनी दारूची बाटली टेबलवर ठेऊन त्याचा फोटो काढून दरमहा तीन हजार रुपयांची खंडणी देण्याची फिर्यादीकडे मागणी केली. फिर्यादींनी खंडणी देण्यास नकार दिला असता आरोपींनी काढलेले फोटो व्हायरल करून त्याची बातमी लावून फिर्यादीची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.