Bhosari News : पत्नी व मुलीला मारहाण केल्याप्रकरणी बापावर गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – पत्नी आणि मुलीला मारहाण केल्याप्रकरणी बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी सदगुरूनगर, भोसरी येथे घडली.

सुनील तानाजी पाटील पाटे (वय 58, रा. सदगुरूनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत आरोपीची मुलगी श्वेता सुनील पाटील पाटे (वय 25) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा बाप आहे. तो फिर्यादी यांच्या आईला घरामध्ये गरजेच्या वस्तू आणून देत नव्हता. तसेच फिर्यादी यांच्या आईला घरातून निघून जा, असे म्हणत होता. याबाबत फिर्यादी आरोपी बापाला समजावून सांगत असताना त्याने फिर्यादी यांच्या आईला शिवीगाळ करून फिर्यादी यांना भिंतीवर ढकलून दिले. त्यानंतर कठड्यावर ढकलून दिले.

यामध्ये फिर्यादी यांच्या ओटीपोटास मुकामार लागून दुखापत झाली. आरोपीने फिर्यादी यांच्या आईच्या पोटावर देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment