Pimpri : मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्या प्रकरणी पिंपरी (Pimpri) स्टेशन येथील हॉटेल कुणाल रेस्टॉरंट बार या हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये पेटत्या शेगडीच्या बाजूला भरलेले गॅस सिलेंडर ठेवल्याचेही समोर आले आहे. ही घटना रविवारी (दि. 4) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली.

Pune : पुणे पोलिसांनी 5 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना केला हस्तांतरित

सनी परमानंद सुखेजा (वय 33, रा. पिंपरी (Pimpri ), सरफराज मोहम्मद अली (वय 35, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सिद्राम बाबा यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि पोलीस नाईक कुऱ्हाडे हे पिंपरी मार्शल ड्युटीवर असताना पिंपरी रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या कुणाल हॉटेलमध्ये त्यांना पेटत्या शेगडीच्या बाजूला तीन गॅस सिलेंडर आढळून आले. हॉटेलमध्ये मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास दोन ग्राहक जेवण करीत होते. दोघेजण जेवण करण्यासाठी आले होते. हेल्पर वेटर आणि आचारी असे आणखी तिघेजण हॉटेलमध्ये होते.

हॉटेल मालकांनी हॉटेलमधील लोकांची आरोग्याची काळजी न घेता तसेच गॅस हा ज्वालाग्रही पदार्थ असल्याचे माहिती असताना त्याच्या बाजूला पेटती शेगडी ठेवून हयगयीचे वर्तन केले. तसेच हॉटेल नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी (Pimpri) पोलीस तपास करीत आहेत.

PMRDA : पेठ क्रमांक 12 मधील पात्र लाभार्थ्यांना 6 जून पासून मिळणार सदनिकांचा ताबा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.