Nigdi : उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळा झेंडा दाखवणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळा झेंडा दाखवून पोलिसांच्या अंगावर येऊन त्यांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड छावा संघटनेच्या उपाध्यक्षा विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 15) दुपारी दीड वाजताच्या सुमारास आकुर्डी (Nigdi) येथे घडली.

गणेश नवनाथ भांडवलकर (वय 28, रा. अजंठानगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत वायाळ यांनी निगडी (Nigdi) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad : नागरिकांना लुटण्याच्या डाव फसला; पाच दरोडेखोरांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आकुर्डी येथील ग. दि.  माडगुळकर नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा झाला. त्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना गणेश भांडवलकर याने काळ्या रंगाचा टी शर्ट हातात घेऊन हवेत फिरवत ताफ्याच्या दिशेने आला. पोलिसांनी त्याला अडवले असता त्याने पोलिसांच्या अंगावर येऊन पोलिसांना धक्काबुक्की केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी (Nigdi) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.