Pune Crime News : लग्नाच्या आमिषाने तरुणीसोबत सलग दोन वर्षे लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षे तरुणीवर सलग दोन वर्षे लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Pune Crime News) करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही मूची हिंगोलीतील आहे. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर लातूर येथील मंगेश महालिंग पटणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. समर्थ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

Dehugaon News : आपला परिवार सोशल फाउंडेशनकडून देहूत 108 देशी झाडांची लागवड;  ऑक्सीजन पार्क करण्याचा संकल्प

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख होती. लग्नाचे आमिष दाखवले आणि नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2021 या काळात पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. रेल्वे स्टेशन परिसरातील लॉजवर, फिर्यादी राहत असलेल्या कर्वेनगर परिसरातील भाड्याच्या घरात शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यानंतरही आरोपीने लग्न करण्यास (Pune Crime News) नकार दिला. त्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.