Alandi : पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – मित्रांसोबत पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 22) सायंकाळी पाचच्या सुमारास वाळके मळा दिघी येथे घडली.

गणेश करकेले (वय 17, रा. दिघी) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

सोमवारी दुपारी गणेश आपल्या काही मित्रांसोबत विहिरीत पोहण्यासाठी गेला. पोहताना अचानक तो पाण्यात बुडाला. मित्रांच्या ही बाब लक्षात येताच मित्रांनी धावाधाव केली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी साडेपाच वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षातून अग्निशमन विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार भोसरी उपकेंद्रातील सबऑफिसर नामदेव शिंगाडे, फायरमन कृष्णा कदम, कैलास डोंगरे, भूतापले, वाहन चालक जालिंदर जाधव आणि मुख्य अग्निशमन केंद्रातील फायरमन दिलीप गायकवाड, अमोल चिपळूणकर, प्रतिक जराड, वाहनचालक प्रमोद जाधव यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. दीड तासाच्या प्रयत्नानंतर संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास गणेश याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.